Download Ammyy Admin Download Dwservice.net

Knowledgebase
Mahitibazaar > माहितीबाझार ऑनलाईन मदत (Mahitibazaar Help desk) > Knowledgebase

शोधा :


माहितीबाजार टीमने आम्हा केंद्र चालकांचा अभिप्राय मांडायची संधी दिली - श्री गणेश म. सोंडकर, शेगाव, बुलडाणा

Solution

नमस्कार सर,

 आज मी आपले मनपूर्वक आभार मानतो कि, माहितीबाजार टीमने आम्हा केंद्र चालकांचा अभिप्राय मांडायची संधी दिली. आपल्याबद्दल काय बोलाव हेच कळत नाही. आपल माहितीबाजार म्हणजे सर्व गुण संपन्न, सर मी आपल्या माहितीबाजार टीम सोबत मागील तीन वर्षा पासून जुळ्लेलो आहे.

            मला ऑनलाइन फॉर्म भरता वेळेस काहीही अडचण आल्यास तुम्ही मला प्रत्येक वेळेला मदत करायचे. आपल्याशी निगडीत असलेल्या सेवाच नाहीतर, तेच्या व्यतिरिक्त कोणतीही अडचणी आल्यास, तरी सुद्धा तुम्ही मदत करायचे. हीच तर असते आपल्या माणसांची ओळख. सर मी ज्या वेळेला सायबर कॅफे सुरु केल, त्यावेळेला ऑनलाइन फॉर्म भरायल मी घाबरायचो, माझ्या मनात शंका रहायची कि, माझ्याकडून फार्म तर नाही चुकणार, माझ्या हातून विद्यार्थ्याचे नुकसान तर नाही होणार, पण मला विश्वास होता आपल्या माहितीबाजार टीमने तयार केलेल्या माहितीपत्रकावर. ते माहितीपत्रक वाचल्या नंतर मी फार्म अगदी सहज भरायचो. हि हिम्मत मला माहितीबाजार टीमकडून मिळाली.

आपल माहिती पत्रक म्हणजे मला एक प्रकारच तुमच्या कडून मिळालेलं वरदान, अगदी सरळ, सोप व अचूक आपल्या मराठी भाषेत बनवलेल. जी मूळ जाहिरात २५ ते ३० पानांची असते ती जाहिरात तुम्ही १ ते २ पानांवर सहज तयार करून देता, यामुळे आमच भरपूर वेळ वाचतो, सर आपल्या माहितीबाजारच्या टीममुळेच मी माझ्या उद्योगात गरूढ झेप घेतली. व दोन वर्ष्याच्या आतच्या कालावधीत माझ्या मालकीची ३१ लाखाची दुकान घेतली. हे बळ मला तुमच्यामुळेचतर आल. मी सदैव तुमचा ऋणी आहे.

 आपला,
गणेश म. सोंडकर
श्री सायबर कॅफे & झेरॉक्स,
शेगाव. जिल्हा बुलडाणा

 

 

 

 

 

 
Was this article helpful? yes / no
Related articles माहितीबाजार हाच माझा आधार....मनीष अनंत खराडे
माहितीबाजार विषयी वयक्तिक मनोगत -बाळासाहेब अंगदराव दहिफळे,परळी,बीड
माहितीबाझार वरील प्रत्येक जाहिरात खात्रीदायक असते -मी अतुल अशोक भालेराव, हडको औरंगाबाद
ठिकाण एक सेवा अनेक - श्री लेंगरे धुळूबा सुखदेव, जेउर, करमाळा, सोलापूर
Article details
Article ID: 21
Category: अभिप्राय(Feedback)
Views: 1275
Rating (Votes): Article rated 3.3/5.0 (24)

 
« Go back

 
Powered by Help Desk Software HESK, brought to you by SysAid