Download Ammyy Admin Download Dwservice.net

Knowledgebase
Mahitibazaar > माहितीबाझार ऑनलाईन मदत (Mahitibazaar Help desk) > Knowledgebase

शोधा :


माहितीबाजार हाच माझा आधार....मनीष अनंत खराडे

Solution

नमस्कार,
मी मनीष अनंत खराडे येवला येथील माहिती बाजार संचालक.अस म्हणतात कि देव जीवनात प्रत्येकाला एक संधी देतो.ती संधी मला माहितीबझार या रूपाने भेटली आणि खरोखर तरलो कारण मी जेव्हा सेनापती स्वयंरोजगार व नोकरी मार्गदर्शन केंद्र हि फर्म विध्यार्थ्यांसाठी उघडली तेव्हा मी इतक्या सुविधा देऊनही माझे दुकानाचे भाडेही मी मिळवू शकलो नाही.पण जेव्हा मी आपली माहिती बाजार चे माहिती बझार केंद्र मिळवले तेव्हा माझे नसीब पालटल्या सारखे झाले.माझी फर्म हि फक्त माहिती बाजार यासाठीच उघडली होती याचा मला पूरेपर अनुभव आला.एक माहिती पत्रक १० रु याप्रमाणे दिवसाकाठी २० माहितीपत्रक कसेही विकले जातात.म्हणजे २०० रुपये.त्यापेक्षाही जास्त विकले जातात फक्त माहितीपत्रक विक्रीतच माझे भाडे व एक माणसाचा पगार निघतो.बाकी फॉर्म ऑनलाईन भरणे pan सुविधा हे सगळे वेगळे.
सगळ्यात महत्वाचे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही त्याचे कारण अतिशय कठीण काळात माहितीबाजार ने मला मदत केली अशाप्रकारे.
मला गेले एक वर्षापासून अतिशय बिकट आजाराने ग्रस्त केले आहे.माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून मला आठवड्यातून दोनदा डायलीसीस चालू आहे.ह्या परिस्थतीत फक्त मी बैठे काम करू शकतो.आणि मला बराच खर्च हि चालू आहे.अशा परीस्थित आपल्या सेंटर मुळे इतका आधार मिळाला कि मला पैशांची उणीवच होऊ दिली नाही.मी पूर्ण वेळ काम करू शकतो.मला कधीच कोनापुढे मदत मागण्याची गरज पडत नाही.

मी माझी पत्नी,मुले आई वडील सर्व जन तुमचे मनापासून खूप खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद

 

आपला 
मनीष अनंत खराडे, येवला
माहिती बाजार केंद्रचालक

 
Was this article helpful? yes / no
Related articles माहिती बाझारने चांगल्या सुविधा दिल्या बद्ल धन्यवाद - विजय नवले, विजय कॉम्पुटर, मालेगाव, नाशिक
माहितीबाजार टीमने आम्हा केंद्र चालकांचा अभिप्राय मांडायची संधी दिली - श्री गणेश म. सोंडकर, शेगाव, बुलडाणा
Article details
Article ID: 17
Category: अभिप्राय(Feedback)
Views: 1373
Rating (Votes): Article rated 3.7/5.0 (34)

 
« Go back

 
Powered by Help Desk Software HESK, brought to you by SysAid